जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महानगरीत खुलेआम धावतायत अनधिकृत रिक्षा-टॅक्सी. मुंबई सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला तरी, इथं कोण येतं आणि कोण जातं, याचा कोणालाही पत्ता नसतो. त्यातच पैशांच्या जोरावर येथे काहीही मिळवता येतं, असं म्हटलं जातं.
या मुंबई महानगरीत रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी तसेच त्यांचे चालक-मालक कितपत खरे आहेत, हेही सांगणं कठीण आहे. याचाच प्रत्यय मुंबईतल्या विमानतळ परिसरात आला.
मनसे वाहतुक सेनेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी अशीच एक टॅक्सी थांबवली आणि त्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आलं.