जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे संदर्भात एक खुलासा केला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्यानं आमच्या डोक्यात हवा गेली, अशी कबुली माजी आमदार आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
“मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्यानं आमच्या डोक्यात हवा गेली आणि त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. लोकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख ढासळला, त्यामुळे आलेख हळूहळू वाढला आसता तर बरं झालं असतं”. असे बाळा नांदगावकर म्हणाले.
त्याचबरोबर शेतकरी आणि ग्रामीण समस्यांकडं दुर्लक्ष झालं अशी कबुली देखील बाळा नांदगावकर यांनी दिली. राज्यात सध्या तरी आमची ‘एकला चलो’ची भूमिका आहे. भविष्यात नेमकं काय होईल, हे सांगता येत नसल्याचं देखील ते म्हणाले. अहमदनगरला ते मनसेच्या आढावा बैठकीत बोलत होते.