जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाली आहे. कल्याणमध्ये मनसेने फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनानंतर रेल्वे आणि महापालिकेला जाग आली.
रेल्वे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केल्यामुळे कल्याणमध्ये फेरीवाल्यांनी काढता पाय घेतला होता. मात्र, अल्पावधीत फेरीवाल्यांनी आपलं बस्तान पुन्हा बसविण्यास सुरूवात केली.
त्यामुळे पुन्हा मनसेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करत फेरीवाल्यांना मुद्देमालासह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय.