परभणी जिल्ह्यासह शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचंच साम्राज्य आहे. या खड्ड्यांच्या विरोधात मनसेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे. यावेळी मनसे सैनिकांनी रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या फोटोला खड्ड्यामध्ये ठेवून त्याला कमळाची फुलं वाहिली.
एवढ्यावरच न थांबता रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सहनशीलतेबद्दल गुलाबाचे फुल देऊन आणि होणाऱ्या अंग दुखीचा त्रास कमी व्हावा यासाठी वेदनाशामक गोळ्यांचंही वाटप केलं.
येणाऱ्या काळात रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास, त्याविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसे सैनिकांनी यावेळी दिलाय.