जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दादर स्टेशनबाहेर पडल्यानंतर पहिल्याच चौकात असणारा कबुतरखाना ही दादरची ओळखच म्हणायला हवी. हाच ब्रिटिशकालीन कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची
मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता.
मात्र, स्थानिक रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं सांगत राज ठाकरे यांच्या मनसेने हा कबुतरखाना म्हणजे कबुतरांचं अनधिकृत खाद्यकेंद्र बंद करण्याची मागणी
केली आहे.