भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय जिवंत महिलेला काल रात्री उंदराने अक्षरशः हाताला कुरतडण्याचे काम केले आहे. रुग्णाचे नाव सुहासिनी माठेकर वय 89 वर्ष असून त्यांना 12 मार्चला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. यावेळी रुग्णालयाचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला, आयसियु सारख्या विभागात सामान्य माणसांना प्रवेश नाही मात्र उदरांनी उच्छाद मांडला आहे.
सकाळी 6 वाजता घरचे नातेवाईक त्यांना बघायला गेले असता हात कुरतडनारा उंदीर पळून गेला, मात्र कर्त्यव्यावरील डॉक्टर किंवा नर्सेस यांनी त्यांनी रात्री बघितले देखील नाही. सकाळी घरचे लोक गेले तेंव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून रुग्णालयात कसे कारभार चालत आहे, हे दिसून आले.
या प्रकरणानंतर भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा राडा पाहायला मिळाला आहे. 89 वर्षीय महिलेला अतिदक्षता विभागात उंदराने हाताला चावल्यामुळे ती महिला रक्तबंबाळ झाली होती, यावरून मनसे आक्रमक आली आहे. यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून डॉक्टरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यानी केला आहे. रुग्णालयाच्या केबिनमधून डॉक्टरांना बाहेर काढण्याची मागणी करत डॉक्टर तडवी हाय हाय घोषणाबाजी देत मनसे कार्यकर्त्यांनी डॉक्टरांबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान आज पहाटे 5 वाजता ही घटना घडली असून, दुर्दैवाने उपचारादरम्यान आज संध्याकाळी या महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने रुग्णालयाच्या कारभाराची लक्तरे मात्र वेशीवर टांगली गेलेली आहेत