राज ठाकरेंचं मराठी उद्योजकांना मार्गदर्शन, मोदींना टोमणे!

“मराठी माणूस धंदा करू शकत नाही हा भ्रम मनातून काढा, महाराष्ट्रातलं वातावरण हे उद्योगधंद्यांसाठी पोषक आहे म्हणूनच बाहेरचे लोक इथे येऊन धंदा करू लागले” असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मी उद्योजक होणारच’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी माणसाला उद्योगासंदर्भात काही मौलिक सल्ले दिले. “उद्योजक बनायचं असेल […]

राज ठाकरेंचं मराठी उद्योजकांना मार्गदर्शन, मोदींना टोमणे!

“मराठी माणूस धंदा करू शकत नाही हा भ्रम मनातून काढा, महाराष्ट्रातलं वातावरण हे उद्योगधंद्यांसाठी पोषक आहे म्हणूनच बाहेरचे लोक इथे येऊन धंदा करू लागले” असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मी उद्योजक होणारच’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी माणसाला उद्योगासंदर्भात काही मौलिक सल्ले दिले.

“उद्योजक बनायचं असेल तर, स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि हिंमत तरुण पिढीत असावी असा कानमंत्रही राज ठाकरेंनी दिला.”

 गुजराती माणसांच्या आडून मोदींना लक्ष्य करत टोमण्याचा भडीमार करत मराठी माणसांना अनेक सल्लेही त्यांनी यावेळी दिले.

राज ठाकरेंचं भाषण – 

  • मोठा विचार करणं ही महत्त्वाची गोष्ट असते 
  • मराठी माणूस धंदा करू शकत नाही हा भ्रम काढा
  • मराठी माणसाने असं वातावरण केलं की बाहेरचे लोक इथे येऊन धंदा करू लागले
  • महाराष्ट्रातील वातावरण उद्योगधंद्यासाठी बाहेरचे लोक येऊ लागले
  • गुजराती माणूस हा हुशार आहे हे आपल्याला आज कळतंय
  • गुजराती माणूस आपल्याकडे मराठी माणूस कधीच ठेवत नाही
  • कारण त्यांना भीती वाटते की हा आपल्याकडे शिकून मोठा होईल
  • मनोहर जोशी यांनी सांगितलं की तुम्ही ताजमहल हॉटेल बांधायला पाहिजे मग त्यांनी का नाही बांधलं
  • ‘यशस्वी कसं व्हायचं’ अशी पुस्तकं वाचून काही होतं नाही
  • पुस्तकं वाचून धंदा होत नाही
  • उद्योग करणाऱ्यांना विनंती की बाहेर जाऊन काय हवंय ते पहा
  • आधी हाताला चटके मग मिळते भाकर
  • स्वप्न आणि हिंमत असेल तर कोणत्याही क्षेत्रात उत्तम राहू शकतो
  • चटके फटके खावेच लागतात
  • मी निवडणुकीचा फंड मागणार नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number