शिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव

रवी सपाते, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे शिवसेनेने मराठी उत्सव संपवण्याची सुपारीच घेतली असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे. ‘ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना हात लावल्यास हात छाटून टाकू’ असा धमकीवजा इशाराही जाधव यांनी ठाणे महापालिकेला दिला आहे. पुन्हा सणांच्या आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची चिन्हं दिसत आहेत. […]

शिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव

रवी सपाते, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

शिवसेनेने मराठी उत्सव संपवण्याची सुपारीच घेतली असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे. ‘ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना हात लावल्यास हात छाटून टाकू’ असा धमकीवजा इशाराही जाधव यांनी ठाणे महापालिकेला दिला आहे.

पुन्हा सणांच्या आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची चिन्हं दिसत आहेत.

यावेळी ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या समर्थनार्थ मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेबरोबर शिवसेनेवर जोरदार टीका केली.

गणेशोत्सव मंडळांमधून मराठी तरुण एकत्र येत आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यावर दंड आकारण्याचा किंवा कारवाई करण्याचा प्रयत्न महापालिकेने केल्यास त्यांची गाठ मनसेशी आहे, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

tmc.jpg

 

शिवसेनेमध्ये धमक राहिलेली नाही- जाधव

शिवसेना आता पूर्वीसारखी राहिलेली नसून ती आता सत्तेमध्ये राहाण्यासाठी तडजोडी करत असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

कायद्याची अमलबजावणी करण्याचं महानगरपालिकेला मराठी सणांच्यावेळीच का सुचतं, असा सवाल जाधव यांनी केला.

गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात कायदा मोडून पहाटे चार पर्यंत दांडिया खेळण्यात येतो, तसंच रस्त्यांवर जेव्हा नमाज पढले जातात, त्यावेळी त्यांच्यावर कारवाई होत नाही याचाही दाखला जाधव यांनी दिला.

 

avinash-jadhav-mns.jpg

शिवसेना हा दुतोंडी साप- जाधव

शिवसेनेला एकीकडे कायदे पाळायचे आहेत पण त्याचवेळी गणेशोत्सव मंडळांनाही हाताशी धरायचे आहे, त्यामुळे शिवसेना ही दुतोंडी सापासारखी आहे, असा आरोप जाधव यांनी केला.

 

दहीहंडी उत्सवही मनसेमुळे टिकला- जाधव

दोन वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवातील थरांच्या उंचीबाबतही कडक निर्बंध लादण्यात आले होते. मात्र कायदा मोडून मनसेने दहीहंडी साजरी केली. त्यामुळेच आता दहीहंडीसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले. अन्यथा दहीहंडीचा उत्सव बंदच झाला असता, असा दावा जाधव यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला.

कायदा बाजूला ठेवून संस्कृती जपण्याच्या उद्देशाने शिवसेना तसंच ठाणे महानगरपालिका अधिका-यांनी गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करू नये, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिका गणेशोत्सव मंडळांसंदर्भात काय भूमिका घेणार, हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number