जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सर्व बँकांचे व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत दिला होता.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्यभरात मनसे कार्यकर्ते बँकांना सर्व व्यवहार मराठीत करण्याचे निवेदन देत आहेत.
ठाणे, नाशिक, कोल्हापुर, उस्मानाबाद आदी ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांना निवदने दिली आहेत.
दुकाने-आस्थापनांचे नामफलक व दैनंदिन व्यवहार हे महाराष्ट्राची राजभाषा मराठीतच असले पाहिजेत असे या निवेदनात म्हंटले आहे.