जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नवी मुंबईतील ऐरोली टोलनाक्यावरील टोलवसूली मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे.
मुलुंडकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.
बेलापुर मार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे होत असलेल्या वाहतुक कोंडीला पर्याय म्हणून या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
ठाण्याकडे जाणारी वाहतुक ऐरोली-मुलुंडमार्गे वळविण्यात आली आहे. टोलनाक्यावर वाहनांची लांबवर रांगा लागलेल्या असताना टोलवसूलीचे काम सुरुच होते.
त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईपर्यंत टोल वसुली न करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.