लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे.
अकबरांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे, दिल्लीच्या पटियाला कोर्टात त्यांनी हा दावा दाखल केला आहे.
तर प्रिया रमाणी यांनी अब्रूनुकसानीचा दाव्याविरोधात लढायला आपण तयार आहोत आणि सत्य हीच आपली ताकद आहे, असं ट्विट करत ठामपणे सांगितलं आहे.
My statement pic.twitter.com/1W7M2lDqPN — Priya Ramani (@priyaramani) October 15, 2018
‘करंजवाला अँड कंपनी’ ही लॉ फर्म कोर्टात अकबर यांचा खटला लढणार आहे, यामध्ये 97 वकिलांची टीम अकबरांच्या खटल्याचा अभ्यास करणार आहे.
या 97 पैकी 6 वकिल कोर्टात अकबर यांची बाजू मांडतील, अकबरांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे असल्याचं म्हटंल आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर #MeToo वादळ का सुरू झाले असा सवाल अकबरांनी उपस्थित केला आहे.