27 एप्रिल रोजी घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा मानहानीकारक पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिट्ल्सचा 9 गडी बाद करत विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करत दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 13 धावांत संघाने 6 गडी गमावले होते. सामना पार पडल्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने पराभवाची जबाबदारी स्विकारली असून दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मिचेल स्टार्क मैदानात दिसत नसून त्याच्या संबंधी अक्षर पटेलने महत्त्वाची माहिती दिली आहे. 1 तारखेपासून मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाला असून त्याला खेळण्याची परवानगी मिळाली आहे. स्टार्कच्या पुनरागमनामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीला मोठी ताकद मिळणार आहे. अॅशेस सिरीज आणि प्लेअर ऑफ द मॅच खेळल्यानंतर त्याला वर्क लोड मॅनेजमेंटमुळे बाहेर बसवण्यात आलं होतं. ज्यामुळे टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये देखील त्याला खेळता आलं नाही.
सध्या दिल्ली कॅपिटल्ससाठी दुष्काळात तेरावा महिना सुरु आहे. फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील दिल्ली कॅपिटल्सचा उतरता क्रम पाहायला मिळतो आहे. अशातच मिचेल स्टार्क संघात पुन्हा सामिल झाला तर संघाचा वनवास कमी होण्यास मदत मिळू शकते. यावेळी अक्षर पटेलने स्पष्टपणे सांगितलं की, त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर सतत लक्ष ठेवलं जात असून तो जेव्हा पूर्णपणे उपलब्ध असेल, तेव्हा आम्ही त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळवण्याचा नक्कीच विचार करू. 11.75 कोटीमध्ये खरेदी केलेल्या मिचेल स्टार्कमुळे दिल्लीची ताकद दुपटीने वाढणार आहे.