जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सोशल मिडियावर आपले फोटोज शेअर करणं आणि त्यावर जास्तीत जास्त लाईक्स मिळवणं हे सर्वांनाच आवडते. पण काही वेळा अनेकांना ते चांगलेच
महागात पडते. महिला क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राज पुन्हा एकदा नेटीझन्सच्या कचाट्यात सापडली आहे.
बुधवारी मितालीनं ट्विटरवर आपल्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत मितालीनं घातलेल्या कपड्यांवरुन तिला ट्रोल करण्यात
आलं. मितालीने घातलेला ड्रेस योग्य नाही, तिने तो फोटो डिलीट करावा असे नेटीझन्सने म्हटले. तर मिताली तू बोल्ड फोटो शेअर केला आहे, तुझ्याकडून
अशीअपेक्षा नाही असेदेखील एका युजरने म्हटले आहे.
मिताली राजला यापूर्वीही ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं होते. पण ट्विटरवर सुरु असलेल्या या ट्रोलवर मितालीनं अद्याप काहीही प्रतिक्रिया
दिलेली नाही.