जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अकरावीची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. अकरा वाजल्यापासून विद्यार्थ्यांना प्रत्येक ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेश अर्ज वाटण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी आवश्यक असणारा अर्ज आणि माहितीपत्रक हे विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण विभागानं दिला. तसंच यंदा कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं.
त्याचप्रमाणं कॉलेजांमध्ये प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना 24 ते 29 जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून तीन जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशामध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाचे पथक कार्यरत राहणार आहे.