नाशिकमधून बेपत्ता झालेले ‘ते’ चारही विद्यार्थी अखेर सुखरुप घरी परतले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकमधून बेपत्ता झालेले चारही विद्यार्थी सुखरुप घरी परतले आहेत. दिंडोरीच्या जनता विद्यालयातून एकाच वेळी चार विद्यार्थी बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती.   इयत्ता नववीमधले हे चारही विद्यार्थी होते. सकाळी अकराच्या सुमारास शाळेत जातो असं सांगून ही चारही मुलं घराबाहेर पडली.   पण शाळा सुटून रात्र झाली तरीही मुलं घरी परतली […]

नाशिकमधून बेपत्ता झालेले ‘ते’ चारही विद्यार्थी अखेर सुखरुप घरी परतले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमधून बेपत्ता झालेले चारही विद्यार्थी सुखरुप घरी परतले आहेत. दिंडोरीच्या जनता विद्यालयातून एकाच वेळी चार विद्यार्थी बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली

होती.

 

इयत्ता नववीमधले हे चारही विद्यार्थी होते. सकाळी अकराच्या सुमारास शाळेत जातो असं सांगून ही चारही मुलं घराबाहेर पडली.

 

पण शाळा सुटून रात्र झाली तरीही मुलं घरी परतली नाहीत. तेव्हा त्यांचे पालक हवालदील झाले.

 

घाबरलेल्या पालकांनी दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर युद्धपातळीवर बेपत्ता मुलांचं शोधकार्य सुरु झालं. पण ही मुलं सापुताऱ्याला फिरण्यासाठी

गेली होती. पहाटेच्या सुमारास ते दिंडोरीला परतले तेव्हा पोलिसांना सापडले. पोलिसांनी मग त्यांना समजावून सुखरुप घरी सोडले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number