बेपत्ता बोट सापडली, प्रवासी सुखरुप !

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर   गुजरात नवा बंदर येथे काल एक बोट बेपत्ता झाली होती. ही बेपत्ता झालेली बोट मिळाली असून बोटीवरील 20 खलाशी सुखरूप आहेत.   गुजरात मधील नवाबंदर येथून 25 ऑगस्टला रामप्रसाद आणि प्रेमसाई या दोन नौका मच्छिमारीकरिता समुद्रात निघाल्या होत्या. 30 ऑगस्टला सकाळी 5 च्या सुमारास समुद्रात 60 किमी वेगाने वादळी वारे वाहत असल्याने […]

बेपत्ता बोट सापडली, प्रवासी सुखरुप !

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

गुजरात नवा बंदर येथे काल एक बोट बेपत्ता झाली होती. ही बेपत्ता झालेली बोट मिळाली असून बोटीवरील 20 खलाशी सुखरूप आहेत.

 

गुजरात मधील नवाबंदर येथून 25 ऑगस्टला रामप्रसाद आणि प्रेमसाई या दोन नौका मच्छिमारीकरिता समुद्रात निघाल्या होत्या. 30

ऑगस्टला सकाळी 5 च्या सुमारास समुद्रात 60 किमी वेगाने वादळी वारे वाहत असल्याने रामप्रसाद ही बोट डहाणू पासून 40 मैल

अंतरावर बुडाली होती. या बोटीवर 10 प्रवासी होते.

 

 

या बोटीचा शोध घेण्यासाठी प्रेमसाई ही बोट पाठवण्यात आली, मात्र काही तासांनतर या बोटीचाही संपर्क तुटला आणि ही बोटदेखील बेपत्ता

झाली होती. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 20 खलाशी बेपत्ता होते. काल संध्याकाळपासून रात्रभर कोस्टगार्डने बोटींचा शोध घेतला.

आज सकाळी 6.30 वाजल्यापासून कोस्टगार्डच्या एअर क्राफ्टद्वारा शोध मोहिम सुरु करण्यात आली.

 

मोबाइल ट्रेसिंगच्या साहाय्याने शोध घेत अखेर तटरक्षक दलाच्या मोठ्या प्रयत्नाने त्या बोटींचा शोध घेण्यात गुजरात-महाराष्ट्र कोस्टलला

यश आले असून दोन्ही बोटीवरील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची महिती मिळते आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number