मिसळ पाव जगात भारी

मिसळ पाव हा पदार्थ नक्की पुण्याचा की कोल्हापूरचा हा वाद अगदीच प्रसिध्द आहे. पण मिसळ कुठलीही असो आपण तिचा अगदी पुरेपूर आनंद घेतो. महाराष्ट्रात तर मिसळ हा लोकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहेच पण आता हीच मिसळ आता महाराष्ट्राचीच नाही तर जगासाठी विशेष ठरली आहे. टेस्ट ऍटलास या वेब साईटने नुकतेच जगातील 50 पारंपारिक विगन पदार्थांची […]

मिसळ पाव जगात भारी

मिसळ पाव हा पदार्थ नक्की पुण्याचा की कोल्हापूरचा हा वाद अगदीच प्रसिध्द आहे. पण मिसळ कुठलीही असो आपण तिचा अगदी पुरेपूर आनंद घेतो. महाराष्ट्रात तर मिसळ हा लोकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहेच पण आता हीच मिसळ आता महाराष्ट्राचीच नाही तर जगासाठी विशेष ठरली आहे. टेस्ट ऍटलास या वेब साईटने नुकतेच जगातील 50 पारंपारिक विगन पदार्थांची यादी प्रसिध्द केली आहे आली आहे. त्यात मिसळ ही 11 व्या स्थानावर आहे.

‘टेस्ट ऍटलास’ नेमकं काय आहे?

तर ‘टेस्ट ऍटलास’ हे जगातील पारंपारिक पदार्थांचे विश्वकोष आहे. जगातील कोणत्याही देशातील पारंपारिक पदार्थ त्यांत वापरले जाणारे पारंपारिक साहित्य या सगळ्याची माहिती टेस्ट ऍटलासच्या वेबसाईटवर मिळते. तसेच तुम्हाला एखाद्या देशाचे पारंपारिक पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट हवे असेल तर त्याची माहितीदेखील टेस्ट ऍटलासवर तुम्हांला उपलब्ध होते.

 मराठमोळ्या मिसळ चा समावेश यात कसा झाला? 

विगन पदार्थ म्हणजे दुधापासून किंवा प्राण्यांपासून तयार न झालेले पदार्थ. मग मिसळमध्ये दुधापासून किंवा प्राण्यांपासून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचा समावेश नसल्याने मिसळ ही जगाच्या 50 पारंपारिक विगन पदार्थांच्या यादीत जाऊन बसली आहे.केवळ मिसळच नाही तरइतरही काही पारंपारिक भारतीय पदार्थ या यादीत आहेत आहेत. यात आलू गोबी 20 व्या स्थानावर, कोबी मंच्युरिअन 24 व्या स्थानावर, मसाला वडा 27 व्या स्थानावर, भेळपुरी 37 व्या स्थानावर तर राजमा चावल 41 स्थानावर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number