अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक पूर्ण नरमले; न्यायालयाची मागितली बिनशर्त माफी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक नरमले असून त्यांनी समीर वानखेडे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. वानखेडे कुटुंबाविरोधात शेरेबाजी केल्याप्रकरणी नवाब मलिकांनी माफीनामा सादर केला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसून मलिकांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली असून यापुढे अशी विधाने करणार नसल्याची हमी मलिकांनी दिली. मी माझ्या सरकारी सेवकपदाच्या […]

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक पूर्ण नरमले; न्यायालयाची मागितली बिनशर्त माफी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक नरमले असून त्यांनी समीर वानखेडे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. वानखेडे कुटुंबाविरोधात शेरेबाजी केल्याप्रकरणी नवाब मलिकांनी माफीनामा सादर केला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसून मलिकांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली असून यापुढे अशी विधाने करणार नसल्याची हमी मलिकांनी दिली.

मी माझ्या सरकारी सेवकपदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाहीत असे नवाब मलिकांनी केले. यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी मलिकांनी खेद व्यक्त केला. तसेच न्यायालयाची बिनर्शत माफी मागून यापुढे विधाने करणार नाही अशी हमी नवाब मलिकांकडून उच्च न्यायालयात देण्यात आली.

नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मानहानिचा दावा दाखल केला. तसेच दाव्यावर सुनावणी होईपर्यंत नवाब मलिकांनी वानखेडे कुटुंबाविरोधात कोणतेही आक्षेपार्ह विधान न करण्याचे आदेश न्यायालयाने मलिकांना दिले होते. तरिही मलिकांनी वानखेडेंविरोधात विधाने केली असल्याचा अर्ज ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे तुमच्या विरोधात नोटीस का काढू नये, यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने मलिकांना दिले होते. त्याप्रमाणे मलिकांनी आज प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची बिनर्शत माफी मागितली असून यापुढे वानखेडेविरोधांत कोणतेही विधान न करण्याची हमी नवाब मलिकांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number