Kalyan Crime : आई घरात नसताना भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, "घरात दोष असल्याचे सांगून…"

कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kalyan Crime : आई घरात नसताना भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, &quotघरात दोष असल्याचे सांगून…&quot

कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 78 वर्षीय भोंदू बाबा शाहिद शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला वर्षभरापासून कल्याण पश्चिम भागात वास्तव्यास आहे. यापूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत उल्हासनगर येथे राहत होती. गेल्या वर्षभरात तिच्या सासू आणि पतीचे निधन झाले होते.

हेही वाचा- Pune Bhor Nasrapur Crime Update : चिमुरडीवर दृष्कृत्य करताना 4-5 लहान मुलांनी अडवलं; मात्र नराधमाने मुलांसोबत केलं क्रूर कृत्य

त्यानंतर ओळखीतील एका व्यक्तीने त्यांच्या घरात बाधा असल्याचे सांगितले. बाधा दूर करून घरात शांती नांदावी यासाठी पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला. या पूजेच्या नावाखाली शाहिद शेख याने 2 मे रोजी महिलेच्या 15 वर्षीय मुलीला समोर बसवून पूजा केली. त्यानंतर 6 मे रोजी तो पुन्हा घरी आला. त्या वेळी मुलीची आई घरात नसताना पूजेच्या बहाण्याने त्याने अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.

पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी अवघ्या एका तासात शाहिद शेख याला अटक केली. दरम्यान, खडकपाडा  पोलिसांनी आरोपीला अटक करून  कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली आरोपीने आणखी किती महिला किंवा मुलींना फसवले आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number