जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली
ड्रोनचा वापर आपण शक्यतो शूटींगसाठी करताना ऐकलं असेल पण आता ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.
कारण ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून कायदेशीर मान्यता दिली आहे. मात्र त्याचसोबत काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत.
2 किलो पेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनसाठी परवाना बंधनकारक असेल. ज्यांना ड्रोनचे परवाने हवे असतील त्यांची वयोमर्यादा 18 पेक्षा जास्त असली पाहिजे तसेच त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
फक्त दिवसा प्रकाशात 400 फूट उंचीपर्यंत तुम्ही ड्रोन उडवू शकता. विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, दिल्लीतला विजय चौक, राज्यातील सचिवालय, लष्करी तळ या ठिकाणी ड्रोनला नो फ्लाय झोन असणार आहे..