कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी मंत्रिगटाची नियुक्ती; शिवसेना मंत्र्यांचाही समावेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.   महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली.   हा उच्चाधिकार मंत्रिगट शेतकरी संघटनांसोबत कर्जमाफीसह विविध मागण्यांसदर्भात चर्चा करणार आहे.   या मंत्रिगटात चंद्रकांत पाटील यांच्यासह कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरिश […]

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी मंत्रिगटाची नियुक्ती; शिवसेना मंत्र्यांचाही समावेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.

 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली.

 

हा उच्चाधिकार मंत्रिगट शेतकरी संघटनांसोबत कर्जमाफीसह विविध मागण्यांसदर्भात चर्चा करणार आहे.

 

या मंत्रिगटात चंद्रकांत पाटील यांच्यासह कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे.

 

हा उच्चाधिकार मंत्रिगट शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपला प्रस्ताव सरकारकडे पाठवणार आहे. चर्चेतून मार्ग काढावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याच अनुषंगानं त्यांनी या मंत्रिगटाची नियुक्ती केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number