कोल्हापूरात मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   कोल्हापुरात शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. शिवाजी पुलावरुन मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर आहेत. मृतांमध्ये पुण्यातील बालेवाडी आणि पिरंगुट इथल्या लोकांचा समावेश आहे. 26 जानेवारीला लागून आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुट […]

कोल्हापूरात मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

कोल्हापुरात शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. शिवाजी पुलावरुन मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर आहेत.

मृतांमध्ये पुण्यातील बालेवाडी आणि पिरंगुट इथल्या लोकांचा समावेश आहे. 26 जानेवारीला लागून आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुट परिसरात राहणारे भरत केदारी, संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी मिनी ट्रॅव्हलरमधून निघाले होते.

शुक्रवारी सकाळी हे कुटुंबीय गणपतीपुळे इथून देवदर्शन आटोपून कोल्हापूरला निघाले होते. त्यादरम्यान कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुलाचा दगडी कठडा तोडून बस थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली. रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. तब्बल 6 तास हे सर्च ऑपरेशन सुरू होते.

गाडी कोसळल्याचा आवाज एकूण सुरूवातीला त्या परिसरातील तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. ही माहिती आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर पोलीस,फायरब्रिगेड, घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात बुडालेल्या गाडीतील 7 जणांना काढण्यात यश आलं . परंतु तासभर प्रयत्न करून देखील मिनी बस गाळातच रुतून बसल्यामुळे गाडीतील इतर प्रवाशांना बाहेर काढता आलं नाही.

kolhapur.png

अखेर क्रेनच्या सहाय्याने मिनी बसला पाण्यातून बाहेर काढण्यात आली व गाडीतील उर्वरित 7 जणांना बाहेर काढण्यात आले. गाडीत एकूण 14 प्रवासी होते, यातील 11 मृतदेह काढण्यात आलेत तर तीन जखमींवर सीपीआर रुगणालायात उपचार सुरु आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचं समजताच पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील , जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट देऊन पाहणी केली.

kolhapur3.png

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number