जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळ झालाय. एमआयएमच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर दादागिरी करून अतिक्रमण हटवल्याची तक्रार भाजप-सेना नगरसेवकांनी केलीय.
तर, जातीयवादाचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केल्यानंतर पालिकेत हमरीतुमरी झालीय. दरम्यान याआधी औरंगाबाद पालिकेच्या याच सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यानं एमआयएमच्या 2 नगरसेवकांना अटक करण्यात आली होती.
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत महापालिकेने दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलीय.