मुंबईत १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात वाढ

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  मुंबईत सुट्ट्या दुधाचे दर वाढणार आहेत. ओला चारा व पशूखाद्यांच्या दरात वाढ झाल्याने मुंबई दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. टोमॅटो व कांद्याच्या दरापासून थोडाफार दिलासा मिळाल्यानंतर आता दुधाच्या वाढत्या किंमतींना तोंड द्यावे लागणार आहे. मुंबईत येत्या १ सप्टेंबरपासून दूध महागणार आहे. […]

मुंबईत १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात वाढ

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  मुंबईत सुट्ट्या दुधाचे दर वाढणार आहेत. ओला चारा व पशूखाद्यांच्या दरात वाढ झाल्याने मुंबई दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. टोमॅटो व कांद्याच्या दरापासून थोडाफार दिलासा मिळाल्यानंतर आता दुधाच्या वाढत्या किंमतींना तोंड द्यावे लागणार आहे. मुंबईत येत्या १ सप्टेंबरपासून दूध महागणार आहे. म्हशीचे सुटे दूध रिटेलमध्ये प्रति लिटर २ ते ३ रुपयांनी महागणार आहे तर होलसेल दरातही २रुपयांची वाढ होणार आहे.

जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. मुंबईत जवळपास ७०० दूध डेअरी असणाऱ्या व ५० हजार म्हैशींचे मालक असणाऱ्या मुंबई दूध संघाची शनिवारी जोगेश्वरी येथे बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध संघाच्या बैठकीनंतर संघाचे कार्यकारी सदस्य सीके सिंह यांनी सांगितले की, जनावरांचा चारा व खाद्य दरात २० टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. त्यामुळे दूर दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरांचा सहा महिन्यानंतर पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे.

सध्या म्हशीच्या सुटे एक ८५ रुपये लिटर आहे. याता हा दर ८७रुपये होईल, तर रिटेलला हे दूध ८७ ते ८८रुपये लिटर दराने मिळेल. नवे दर १ सप्टेंबरपासून लागू होतील. गेल्या जवळपास महिनाभरापासून राज्यात पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झाला आहे. अनेक भागात चारा टंचाई निर्माण झाल्याने याचे दर वाढले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number