जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. कोरेगाव-भीमा इथं झालेल्या हिंसाचाराचा एकबोटेंवर आरोप आहे.
दगडफेकीचा गुन्हा नोंदवल्यानंतर एकबोटेंची न्यायालयात धाव घेतली होती. पुणे सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
भीमा-कोरेगाव दगडफेकीत एकबोटेंविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
मिलिंद एकबोटे हे हिंदू एकता आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर दगडफेकीस प्रवृत्त करणे आणि लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे सुद्धा आरोपी आहेत. विशेष म्हणजे कोरेगाव भीमाच्या हिंसाचारानंतर आजपर्यंत मिलिंद एकबोटे पोलिसांना सापडत नाहीत.