Crude Oil Price: तेलाचा भडका! कच्च्या तेलाचे दर 150 डॉलरच्या उंबरठ्यावर; ट्रम्प यांच्या ‘त्या’ इशाऱ्यानं जागतिक तेल बाजार हादरलं

होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Crude Oil Price: तेलाचा भडका! कच्च्या तेलाचे दर 150 डॉलरच्या उंबरठ्यावर; ट्रम्प यांच्या ‘त्या’ इशाऱ्यानं जागतिक तेल बाजार हादरलं

इराण: मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा आज 32 वा दिवस असून, 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, इराणमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना फटका बसला आहे. युद्धविरामासाठीचे प्रयत्नही अद्याप यशस्वी ठरलेले नाहीत.

या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. मंगळवार, 31 मार्च 2026 रोजी ब्रेंट क्रूडचे दर 116.50 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. जून 2022 नंतरचा हा सर्वोच्च स्तर मानला जात आहे. वाढत्या संघर्षामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असून, बाजारात अस्थिरता वाढली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळेही या परिस्थितीला अधिक तीव्रता मिळाल्याचे दिसत आहे. त्यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेत, आवश्यक असल्यास खार्ग बेटावर ताबा मिळवण्याचा इशारा दिला आहे. याच ठिकाणावरून इराणच्या सुमारे 90 टक्के तेल निर्यातीचे संचालन केले जाते.

हेही वाचा: Weather Update : राज्यात पावसासह गारपिटीचा हाहाकार; 'या' जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी

तसेच, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी उघडली नाही तर कठोर कारवाई करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. या आक्रमक भूमिकेमुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, मार्च महिन्यातच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 50 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक केली जाते.

तेल बाजार विश्लेषकांचा इशारा आहे की, जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर कच्च्या तेलाचे दर 150 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि इंधन दरांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Talwar Baba : अंगात संचार येतो, हातात तलवार घेवून भक्तांना भुलथापा मारतो; भोंदू खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number