Mhada News: खुशखबर! म्हाडाच्या घराच्या किंमतींमध्ये मोठी कपात, अर्ज करण्याची मुदतही वाढली, जाणून घ्या

म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्या आणि घराची  किंमत जास्त असल्याने माघार घेणाऱ्या उमेदवारांना, अर्जदारांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे

Mhada News: खुशखबर! म्हाडाच्या घराच्या किंमतींमध्ये मोठी कपात, अर्ज करण्याची मुदतही वाढली, जाणून घ्या

मुंबईमध्ये स्वत:चं घर असावं ही प्रत्येक नागरिकाचं स्वप्न आहे. हे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसतं. अशातच आता म्हाडाअंतर्गत घरं घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता म्हाडाच्या घरांच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्या आणि घराची  किंमत जास्त असल्याने माघार घेणाऱ्या उमेदवारांना, अर्जदारांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे

संकेत क्रमांक 538, बिल्डिंग क्र. 2 अ, ब, पॉकेट-2, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील 480 सदनिकांची विक्री किंमत 1 कोटी 45 लाख 58 हजार 307 ते 1 कोटी 47 लाख 97 हजार 992 इतकी होती. तर, संकेत क्रमांक 539, बिल्डिंग क्र. 3 अ, ब, क, पॉकेट-2, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील 741 सदनिकांची विक्री किंमत 1 कोटी 45 लाख 74 हजार 942 ते 1 कोटी 48 लाख 14 हजार 901 इतकी होती.

 सदर सदनिकांच्या किमतीत प्रती सदनिका 7.5 टक्के कपात करण्यात येऊन सुधारित किंमती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, येथील घरांच्या किंमतीत तब्बल 10 ते 11 लाख रुपयांची कपात झाल्याचं दिसून येत आहे. नव्या किंमतीनुसार, संकेत क्रमांक 538 येथील घरांची किंमत 1 कोटी 34 लाख 66 हजार 434 ते 1 कोटी 36 लाख 88 हजार 143 रुपये एवढी करण्यात आली आहे. तसेच, संकेत क्रमांक 539 विक्रोळी येथील 741 घरांची किंमत कमी करुन 1 कोटी 34 लाख 81 हजार 821 ते 1 कोटी 37 लाख 03 हजार 783 रुपये एवढी करण्यात आली आहे. सदर प्रकल्पातील प्रत्येक सदनिकेस 1 वाहनतळ (पार्किंग) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 14 मे 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, या घरांसाठीची  संगणकीय सोडत 5 जून 2026 रोजी काढण्यात येणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number