घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर…

मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहणा-यांसाठी एक खुशखबर…  धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे दिवाळीतच म्हाडाच्या लॉटरीची जाहिरात निघणार आहे. ही सोडत मुंबईतील 1 हजार 194 घरांसाठी प्रसिद्ध होणार आहे. म्हाडाने यावर्षी घराच्या किमतीसंदर्भात नवं धोरणही आखले आहे. ज्यानुसार घरांच्या किंमती या 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. या भागात मिळणार घरं, इतक्या किमतीत – अँटॉप हिल वडाळा […]

घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर…

मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहणा-यांसाठी एक खुशखबर… 

धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे दिवाळीतच म्हाडाच्या लॉटरीची जाहिरात निघणार आहे. ही सोडत मुंबईतील 1 हजार 194 घरांसाठी प्रसिद्ध होणार आहे.

म्हाडाने यावर्षी घराच्या किमतीसंदर्भात नवं धोरणही आखले आहे. ज्यानुसार घरांच्या किंमती या 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

या भागात मिळणार घरं, इतक्या किमतीत –

  • अँटॉप हिल वडाळा भागात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 278 घरं उपलब्ध – ज्याची किंमत 30 लाख 71 हजार असणार आहे.
  • प्रतिक्षा नगर सायन येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 83 घरं – ज्याची किंमत 28 लाख 70 हजार 700 असणार आहे.
  • मानखुर्दमध्ये 114 घरं आहेत जी अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध – या घराची किंमत 27 लाख 26 हजार 757 असणार आहे.
  • गव्हाणपाडा मुलुंड या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी 269 घरं – ज्याची किंमत 30 लाख 7 हजार 757 रुपये असणार आहे.
  • सिद्धार्थ नगर गोरेगावमध्येही 24 घरं उपलब्ध – जी अल्प उत्पन्न गटासाठी असून त्याची किंमत 31 लाख 85 हजार असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number