बाप रे! म्हाडाच्या लॉटरीतील घराची किंमत 1 कोटी 61 लाख

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईतील म्हाडाची घरं आता आवाक्याबाहेर जाऊ लागलं असं दिसून येत आहे. कारण पवईतल्या तुंगा भागातील म्हाडाच्या इमारतीतील जवळपास 800 स्क्वेअर फुटांचा सर्वात महागडा प्लॅट 1 कोटी 61 लाखांना विकला जाणार आहे.   पवईतल्या तुंगा इमारतीचे प्लॅट विकण्यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती मागवल्यानंतर ही बाब समोर आली. […]

बाप रे! म्हाडाच्या लॉटरीतील घराची किंमत 1 कोटी 61 लाख

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील म्हाडाची घरं आता आवाक्याबाहेर जाऊ लागलं असं दिसून येत आहे. कारण पवईतल्या तुंगा भागातील म्हाडाच्या इमारतीतील जवळपास 800 स्क्वेअर फुटांचा सर्वात महागडा प्लॅट 1 कोटी 61 लाखांना विकला जाणार आहे.

 

पवईतल्या तुंगा इमारतीचे प्लॅट विकण्यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती मागवल्यानंतर ही बाब समोर आली. वास्तविक, बांधकामाच्या खर्चावर म्हाडाच्या घराची किंमत ठरते.

 

प्रशासकीय खर्च आणि सोडतीचा खर्च यासाठी म्हाडा उच्च उत्पन्न गटातील घरांच्या रकमेवर 10 टक्के नफा वसूल करते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांसाठी स्वस्त दरात घरं उपलब्ध करुन देण्यासंदर्भात योजना तयार करत आहेत. तर दुसरीकडे म्हाडाच्या घरांच्या किमती गगनाला भिडत असल्याने, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील म्हाडाची घरं आता महाग झाली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number