जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत मट्रोचं जाळं पसरत असताना पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. मेट्रोचं कामादरम्यान जी झाडे तोडली जातात त्या बदल्यात तीन झाडे लावण्याचे कोर्टाचे आदेश असताना मेट्रोच्या अधिका-यांकडून त्याचे उल्लंघन होतयं. मेट्रोचे काम करताना 900 झाडे तोडण्यात आली होती. पण प्रत्यक्ष पाहणी करण्याचं ठरवलं तेव्हा या पहाणीत फक्त 400 झाडं लावण्यात आली असल्याचं उघड झालंय.
बाकीची 2300 झाडे लावलीच नसल्याचे उघड झाल्यानंतर संतापलेल्या रामदास कदम यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. यापुढे मेट्रोला एकही झाड तोडून देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.