‘Metro Aqua Line 3’चं विद्यार्थी आणि पर्यटकांना खास गिफ्ट, मिळणार अमर्यादित प्रवास करण्याची संधी, पण…

त्यामुळे आता विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

‘Metro Aqua Line 3’चं विद्यार्थी आणि पर्यटकांना खास गिफ्ट, मिळणार अमर्यादित प्रवास करण्याची संधी, पण…

मुंबईतील मेट्रो 3 ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी तसेच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारा करण्यासाठी विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मेट्रो रेलच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च आता 25 टक्क्यांनी कमी झाला आहे. शाळा-महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रोने मोठा आधार दिला आहे. 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे सवलत लागू असणार आहे. 45 आणि 60 ट्रिप पासवर 25 टक्के थेट सवलत मिळणार आहे. याची वैधता 30 दिवस असणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांचा दरमहा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाची खात्री मिळणार आहे.

पर्यटकांच्या सेवेसाठी अनलिमिटेड मेट्रो राईड असणार असून मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यकांसाठी मेट्रोने खास टुरिस्ट पासही सादर केले आहेत.
 
1 दिवसाचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त 280 रूपये 
3 दिवसांचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त 700 रूपये 

दिव्यांग आणि नियमित प्रवाशांनाही लाभ
केवळ विद्यार्थीच नव्हे, तर दिव्यांग प्रवाशांनाही 45 आणि 60 ट्रिप पासवर 25 टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, नियमित नोकरदार वर्गासाठी MetroConnect3 ॲपवर 45 ट्रिपसाठी 10 टक्के आणि 60 ट्रिपसाठी 15 टक्के सवलत आता NCMC कार्डच्या माध्यमातून घेता येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number