जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मेट्रोच्या कामासाठी होणा-या वृक्षतोडीवरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
कारण, मेट्रोकामांसाठी मुंबईभरात एकूण 3 हजार 181 झाडे तोडण्यात येणार आहेत. खरं तर मेट्रो कामांसाठी दिल्या जाणा-या वृक्षतोडीच्या परवानगीला स्थगीती देऊन न्यायालयानं पालिकेला दणका दिला असला तरी येत्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीत मेट्रोकामांसाठी जवळपास 1 हजार वृक्षांना कापण्याचे प्रस्ताव येणार आहेत.
अंधेरी आणि आरे कॉलनीमधील हे प्रस्ताव आहेत. तसेच मालवणी येते मेट्रो २ च्या डेपो व वर्कशॉपसाठी 500 झाडे तोडण्यात येणार आहेत.