लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने प्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांची ‘इंडियन आयडॉल’ या रियलिटी शोमधून हकालपट्टी करण्यात आली.
मलिक यांच्यावर आतापर्यंत गायिका श्वेता पंडित, सोना महापात्रा आणि दोन अज्ञात महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला. मलिक यांच्यावर आरोप झाल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करायची की नाही याबद्दल चॅनेलने कोणतीच भूमिका घेतली नव्हती. मात्र भूमिका ठरवण्यासाठी चॅनेलच्या वारंवार बैठका होत होत्या. परंतु अखेर चॅनेलने हा निर्णय घेतला आणि त्यांची शोमधून बाहेर काढण्यात आली.
‘पण सध्या जे काही वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे हा शो,संगीत क्षेत्र आणि कामावर लक्ष देता येत नाही. त्यामुळेच मी या शोमधून बाहेर पडत असल्याचं’ मलिक यांनी आपली बाजू मांडली आहे.