Facebook New Feature: इन्स्टा-फेसबुकच्या माध्यमातून करा बक्कळ कमाई; मेटाचे नवीन ‘भन्नाट’ फीचर लाँच; पाहा कसे काम करणार

या फीचरमुळे वापरकर्ते एखाद्या पोस्ट किंवा रीलमध्ये दिसणाऱ्या प्रोडक्टवर क्लिक करून थेट खरेदी करू शकतील.

Facebook New Feature: इन्स्टा-फेसबुकच्या माध्यमातून करा बक्कळ कमाई; मेटाचे नवीन ‘भन्नाट’ फीचर लाँच; पाहा कसे काम करणार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कमाईच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने मेटा कंपनीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कंपनीने “Facebook Affiliate Partnerships” या नव्या फीचरची घोषणा केली आहे. या फीचरमुळे कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या पोस्ट आणि रील्समध्ये थेट प्रोडक्ट लिंक जोडता येणार असून त्या लिंकद्वारे झालेल्या खरेदीवर त्यांना कमिशन मिळणार आहे.

शॉपटॉक 2026 परिषदेत या फीचरची घोषणा करताना मेटाने स्पष्ट केले की, क्रिएटर मॉनेटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन-ॲप शॉपिंग यांचा संगम घडवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना मजबूत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. आतापर्यंत क्रिएटर्सना त्यांच्या पोस्ट किंवा रील्समध्ये थेट प्रोडक्ट टॅग करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे त्यांना बायो किंवा कमेंटमध्ये लिंक द्यावी लागत होती. आता मात्र पोस्टमधूनच प्रोडक्ट टॅग करून थेट खरेदीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या फीचरमुळे वापरकर्ते एखाद्या पोस्ट किंवा रीलमध्ये दिसणाऱ्या प्रोडक्टवर क्लिक करून थेट खरेदी करू शकतील. त्या खरेदीवर संबंधित क्रिएटरला ठरावीक कमिशन मिळेल. त्यामुळे कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी कमाईचा आणखी एक मार्ग खुला होणार आहे.

हेही वाचा: Vijay Wadettiwar On Ashok Kharat Case : "ते पेन ड्राईव्ह समोर आलं तर…" खरातप्रकरणी वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

हे फीचर कसे काम करेल?

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध असेल. क्रिएटर्सना त्यांच्या रील्ससह फोटो पोस्टमध्येही प्रोडक्ट टॅग करण्याचा पर्याय दिला जाईल. एकदा प्रोडक्ट जोडल्यावर पोस्टमध्ये स्पष्ट दिसणारा क्लिकेबल बॅनर दिसेल. वापरकर्ता जेव्हा त्या बॅनरवर क्लिक करेल तेव्हा त्याला संबंधित ई-कॉमर्स पार्टनरच्या ॲप किंवा वेबसाइटवर नेले जाईल, जिथे तो थेट खरेदी पूर्ण करू शकतो.

सध्या कंपनीने हे फीचर मर्यादित देशांमध्ये सुरू केले आहे. अमेझॉनसाठी ही सुविधा अमेरिकेत उपलब्ध झाली आहे, तर शॉपीसाठी सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, ब्राझील आणि तैवानमध्ये ती सुरू करण्यात आली आहे.

मेटाने सांगितले की, पुढील काळात हे फीचर आणखी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि इतर देशांमध्येही विस्तारले जाईल. त्यामुळे सोशल मीडिया आणि ऑनलाइन शॉपिंग यांचे एकत्रीकरण अधिक वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: PM Kisan Scheme: OTP ची कटकट संपली; PM Kisan योजनेसाठी घरबसल्या अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number