‘या’ आमदाराच्या हत्येचा कट उघडकीस

पुण्याच्या दौंड विधानसभेच्या आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडालीय. पोलीसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली आहे. आमदार राहुल कुल यांच्या गाडीला अवजड वहानाच्या धडकेने अपघात करण्याचा किंवा विहिरीच्या ब्लास्टींगसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांनी गाडी उडविण्याचा कट रचला होता. काही दिवसांपूर्वी कुल यांचे कार्यकर्ते तसंच पत्रकारांच्या […]

‘या’ आमदाराच्या हत्येचा कट उघडकीस

पुण्याच्या दौंड विधानसभेच्या आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडालीय. पोलीसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली आहे.

आमदार राहुल कुल यांच्या गाडीला अवजड वहानाच्या धडकेने अपघात करण्याचा किंवा विहिरीच्या ब्लास्टींगसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांनी गाडी उडविण्याचा कट रचला होता. काही दिवसांपूर्वी कुल यांचे कार्यकर्ते तसंच पत्रकारांच्या मोबाइलवर राहुल कुल यांच्या हत्येच्या कटासंदर्भात मेसेज आले होते. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी खबऱ्यांमार्फत तपास सुरू केला.

तपासानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. परंतु खुनाच्या कटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रशासन स्वच्छ करण्याच्या मोहीमेमुळे हितसंबंध दुखवलेल्या समाजकंटकाचा यामागे हात असण्याची शक्यता खुद्द कुल यांनी वर्तवली आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number