जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
भारताचे राष्ट्रपती कोण होणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल.
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत आहे. 776 खासदार आणि 4 हजार 120 आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य 10 लाख 98 हजार 882 इतकं आहे आणि विजयासाठी कोविंद यांना फक्त 5 लाख 49 हजार 442 मतं गरजेची आहेत. त्यामुळे आता विक्रमी मतदानासह कोविंद जिंकतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.