Buldhana Crime: शेअर मार्केटमध्ये मोठा तोटा, नवऱ्याची बायकोकडे धक्कादायक मागणी; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं काय घडलं?

बुलढाण्यातील मेहकर येथे शेअर मार्केटमधील नुकसानानंतर माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे.

Buldhana Crime: शेअर मार्केटमध्ये मोठा तोटा, नवऱ्याची बायकोकडे धक्कादायक मागणी; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं काय घडलं?

Buldhana Crime: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा सातत्याने छळ केल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून सासू, सासरे आणि नणंद फरार असल्याची माहिती आहे.

मृत विवाहितेचे नाव वैष्णवी गणेश मेरत (वय 26) असे आहे. वैष्णवीचा विवाह काही वर्षांपूर्वी गणेश मेरत याच्याशी झाला होता. लग्नावेळी मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही सासरच्या मंडळींकडून अधिक पैशांची मागणी होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा : Adv. Ujjwal Nikam : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती; खटल्याबाबत दिली पहिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा पती गणेश मेरत याला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर त्याने वैष्णवीकडे माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली. या मागणीसाठी वैष्णवीवर मानसिक तसेच शारीरिक अत्याचार करण्यात येत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सततच्या छळामुळे वैष्णवी मानसिक तणावाखाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या प्रकरणी वैष्णवीच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती गणेश मेरत, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती गणेश मेरत याला अटक केली आहे. तर इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा: Ketan Agarwal Murder Case Update: होणाऱ्या पतीला लोहगड कड्यावरून ढकलून देणाऱ्या सियाचा पोलीस कोठडीत माज; पश्चाताप तर लांबच, केली ही मागणी

 या घटनेमुळे मेहकर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे एका तरुण विवाहितेला आपले जीवन संपवावे लागल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number