आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. दुरूस्तीच्या कामांसाठी रेल्वेचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.   हार्बरच्या नेरूळ ते पनवेल अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या वेळेत ब्लॉक असल्याने पनवेल ते अंधेरी मार्गावरील वाहतूकही बंद […]

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. दुरूस्तीच्या कामांसाठी रेल्वेचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

 

हार्बरच्या नेरूळ ते पनवेल अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या वेळेत ब्लॉक असल्याने पनवेल ते अंधेरी मार्गावरील वाहतूकही बंद असेल. तसेच ट्रान्सहार्बरची वाहतूकही नेरूळ ते पनवेलदरम्यान बंद राहील.

 

तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 03.3 पर्यंत सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. यावेळी फास्ट ट्रॅकवरील वाहतूक सांताक्रूझ ते माहीम स्लो ट्रॅकवरून चालवण्यात येईल. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांनी आज गरज असल्यास घराबाहेर पडावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number