रेल्वेचे वेळापत्रक बघूनच रविवारी घरा बाहेर पडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   यंदाच्या रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर, हार्बरवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी ते वांद्रे डाऊन आणि चुनाभट्टी ते वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर तसेच पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार […]

रेल्वेचे वेळापत्रक बघूनच रविवारी घरा बाहेर पडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

यंदाच्या रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर, हार्बरवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी ते वांद्रे डाऊन आणि चुनाभट्टी ते वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर तसेच पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

असा आहे तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक 

मध्य रेल्वेवर सकाळी 11 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर

कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवणार

रत्नागिरी ते दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंतच

दादर ते रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातूनच सोडण्यात येणार

पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 वाजून 35 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार

हार्बर रेल्वेवर सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी ते दुपारी 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी ते वांद्रे डाऊन आणि अप मार्गावर

कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल तसेच सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार

बदलापूर कर्जत दरम्यान रेल्वेचा विशेष ब्लॉक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number