हार्बर मार्गावर चार दिवसांचा विशेष ब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बेलापूर-उरण नवीन मार्गासाठी 22  ते 25 डिसेंबरपर्यंत हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्मचं काम हाती घेण्यात येणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे. एकूण 13 तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे. तर, सगळ्यात मोठा ब्लॉक हा 24 तारखेच्या मध्यरात्री ते 25च्या अर्ध्या दिवसांपर्यंत असणार आहे.   शनिवारी […]

हार्बर मार्गावर चार दिवसांचा विशेष ब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेलापूर-उरण नवीन मार्गासाठी 22  ते 25 डिसेंबरपर्यंत हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्मचं काम हाती घेण्यात येणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे. एकूण 13 तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे. तर, सगळ्यात मोठा ब्लॉक हा 24 तारखेच्या मध्यरात्री ते 25च्या अर्ध्या दिवसांपर्यंत असणार आहे.

 

शनिवारी बेलापूर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरुन कामाला सुरुवात होणार असल्याने 33 लोकल रद्द केल्या जाणार आहेत. तर, काही लोकल या वाशीहून सोडल्या जातील. काही प्लॅटफॉर्म 3हून सोडल्या जाणार आहेत. रविवारी 12 लोकल रद्द तर, 24 लोकल सोडल्या जाणार आहेत. आणि 25 तारखेला 104 लोकल रद्द तर, 100 लोकल चालवल्या जातील.

 

 

बेलापूर ते पनवेल ट्रेन पूर्णपणे बंद असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी नवी मुंबई परिवहन 30 अतिरिक्त बसेस सोडणार आहेत. आजपासून पुढील 4 दिवस हा ब्लॉक असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number