रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रविवारी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. घराबाहेर निघताना लोकलचे वेळापत्रक बघूनच घरबाहेर निघावे लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर कल्याण ते दिवा अप जलदगती या दरम्यान  सकाळी 11.15 ते सायं. 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यावेळी कल्याण ते […]

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रविवारी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. घराबाहेर निघताना लोकलचे वेळापत्रक बघूनच घरबाहेर निघावे लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर कल्याण ते दिवा अप जलदगती या दरम्यान  सकाळी 11.15 ते सायं. 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यावेळी कल्याण ते दिवा अप जलदगती मार्गावरील लोकल अप धीम्या गतीच्या मार्गावर धावणार असून सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.तर मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी  11.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीमा गती मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी  10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

असा असेल ब्लॉक 

मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर कल्याण ते दिवा अप जलदगती या दरम्यान  सकाळी 11.15 ते सायं. 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

कल्याण ते दिवा अप जलदगती मार्गावरील लोकल अप धीम्या गतीच्या मार्गावर धावणार असून सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

पनवेल ते नेरूळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर  रविवारी सकाळी  11.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

सीएसएमटी ते नेरूळदरम्यान लोकल धावणार असून अंधेरी-पनवेल लोकलसेवा ब्लॉक काळात रद्द

चर्चगेट  ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीमा गती मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक

सकाळी  10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

 ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार

काही लोकल रद्द करण्यात येणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number