जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक आहे.
हार्बर मार्गावर पनवेल ते मानखुर्दमध्ये सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
मेगाब्लॉक च्या काळात रेल्वेसेवा खंडीत राहील्याने नवी मुंबईत ते मुंबईत दरम्यान प्रवास करताना अडचनींना सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला नागरीकांचा रस्ते मार्गे प्रवास होणार असून ट्राफीक आणि सीगन्लला तोंड द्याव लागणार आहे.
मध्य रेल्वेवरही कल्याण ते ठाणे दरम्यान स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात स्लो मार्गावरची वाहतूक फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकात थांबणार नाहीत.