वृत्तसंस्था, मुंबई
वैद्यकीय प्रवेशासाठी जातीचा खोटा दाखल द्याल तर सावधान ! कारण असं केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. मुंबई उच्च न्यायालयानं तसे आदेश दिले आहेत.
एका विद्यार्थ्यानं खोटा जातीचा दाखल दिल्याचं निष्पन्न झाल्यानं कोर्टानं हा निर्णय दिला. 4 वर्षांपूर्वी सुधीर साहु या विद्यार्थ्यानं एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात प्रवेश
मिळवला.
त्याचा जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरवला. याविरोधात त्यानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली.
मात्र, त्यानेच लबाडी करून वैद्यकीय प्रवेश मिळवल्याचं समोर आले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले.