Medical Store Strike: 20 मे रोजी पुणे-मुंबईसह राज्यभरातील सर्व मेडिकल स्टोअर्स राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण

20 मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल स्टोअर्स बंद राहणार आहेत. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

Medical Store Strike: 20 मे रोजी पुणे-मुंबईसह राज्यभरातील सर्व मेडिकल स्टोअर्स राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण

Medical Store Strike: राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 20 मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंदची हाक दिली आहे. पुणे शहरासह राज्यातील अनेक भागांमध्ये मेडिकल स्टोअर्स त्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने हा निर्णय घेतला असून, बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात हा आंदोलनात्मक बंद पुकारण्यात आला आहे.

औषध विक्रेत्यांच्या मते, ऑनलाईन पद्धतीने नियमबाह्य औषध विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण होत असून, योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे सहज उपलब्ध होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर छोट्या मेडिकल दुकानदारांवर आर्थिक संकट ओढवल्याचाही आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा: Reels Cyber Crime: व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंक्स वरून Instagram रिल्स पाहताय? जरा जपून! मेटाने दिली धोक्याची घंटा

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या प्रश्नांबाबत केंद्र सरकार आणि संबंधित विभागांकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर देशव्यापी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बंदमध्ये महाराष्ट्रातील हजारो मेडिकल दुकानदार सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूरसह विविध शहरांमधील औषध विक्रेते आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा आधीच करून ठेवावा, असं आवाहनही करण्यात येत आहे.

हेही वाचा: EPFO 3.0: आता PF चे पैसे काढणे होणार सोपे; ATM आणि UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा 'या' तारखेपासून होणार सुरू

रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक औषधांची उपलब्धता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत काही ठिकाणी मर्यादित सेवा सुरू राहण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे ऑनलाईन औषध विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number