जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मयुरेश हळदणकर या 19 वर्षीय तरुणानं आपला जीव गमवला आहे.
मयुरेश घरातला एकुलता एक कमवणारा मुलगा होता. कुटुंबाची जबाबदारी एकट्या मुयरेशच्या खांद्यावर होती.
पब्लिक कंपनीत मयुरेश रनरबॉय म्हणून काम करत होता. परिसरातील प्रत्येकाशी मिळून-मिसळून राहणारा, प्रत्येक सणा-कार्यात आवर्जून सहभागी होणार मयुरेश सर्वांच्याच परिचयाचा होता.
पण, तो असा अचानक मनाला चटका लावून जाईल याची कुणाला साधी कल्पनाही नव्हती. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मयुरेश हळदणकरचा नाहक जीव गेला. त्यामुळे वरळीतल्या त्याच्या घरात शोककळा पसरलीय.