वृत्तसंस्था, नवी दिल्ली बसपा अध्यक्षा मायावती यांनी अखेर राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्यामुळे बीएसपी प्रमुख मायावतींनी राजीनामा दिला आहे. मायावतींनी सभापतींकडे राज्यसभेचा राजीनामा सुपूर्द केला. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले व चांगलाच गदारोळ केला.