‘मविआत आता राष्ट्रवादी मोठा भाऊ’

महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्या तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला होता. जागावाटपाचे प्रकरण लवकरच निकाली काढण्यात येईल. २१ मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात काँग्रेसचे तीन नेते पाठवणार आहोत. सर्व जागा गुणवत्तेच्या […]

‘मविआत आता राष्ट्रवादी मोठा भाऊ’

महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्या तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला होता. जागावाटपाचे प्रकरण लवकरच निकाली काढण्यात येईल. २१ मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात काँग्रेसचे तीन नेते पाठवणार आहोत. सर्व जागा गुणवत्तेच्या आणि विजयी होण्याच्या आधारावर ठरवल्या जातील. तशीच चर्चा समितीमध्ये होईल, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला होता.

मात्र आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पटोलेंना थेट उत्तर देत त्यांचे कान टोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तुमची जास्त ताकद असेल तर महाविकास आघाडीमध्ये तुमचे महत्त्व कायम असेल. यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या. त्यामुळे वाटाघाटी करताना राष्ट्रवादी काँग्रेसला लहान भावाची भूमिका घ्यावी लागत होती. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. काँग्रेसच्या ४४ जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ जागा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा भाऊ आहे.

दरम्यान, सध्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत सतत चर्चा सुरू असते. त्यातून ऐनवेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आघाडीत कुठलीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस मात्र तयारीला लागल्याचे चित्र पटोले यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number