राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, या घडामोडींचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, अशी चर्चाही सुरू झाली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठीची वज्रमूठ आता सैल पडतेय का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीच्या नियोजित सभा रद्द झाल्याचे सांगण्यात येते.
महाविकास आघाडीच्या पुढील नियोजित सभांवर ऊन- पावसांचं सावट निर्माण झाले आहे. उन पावसाच्या या अवकाळाचे सावट महाविकास आघाडीच्या सभांवर जमा होत आहे. एका नेत्याने उन्हामुळे सभेवर प्रश्नचिन्हं निर्माण केले आहे. तर महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या नेत्याने पावसामुळे सभांवर साशंकता निर्माण केले आहे. त्यामुळे वज्रमूठ सभांवरून महाविकास आघाडीत सावळा गोंधळ सुरू झाले आहे.
तीन पक्ष, तीन नेते आणि तीन वक्तव्ये होत आहेत. पुण्यात होणारी वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच आघाडीच्या नियोजित चार ही सभा रद्द झाल्याचे सांगण्यात चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “सद्या पाऊस होत आहे, त्यामुळे सभा होणार की नाही सांगता येणार नाही.” तर याच्या अगदी उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, उन्हाळाच एवढा आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पुढील सभा या पार पडणं अवघड जाईल, असे म्हणाले.