पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मविआचा झेंडा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या २१ जागांपैकी १४ जागांवर संचालक बिनविरोध निवडून आले तर उर्वरित ७ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते. या ७ जागांवरील निकाल लागला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व मिळवले आहे. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणी झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर मविआचा झेंडा फडकला […]

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मविआचा झेंडा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या २१ जागांपैकी १४ जागांवर संचालक बिनविरोध निवडून आले तर उर्वरित ७ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते. या ७ जागांवरील निकाल लागला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व मिळवले आहे. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणी झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर मविआचा झेंडा फडकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली २१ पैकी २० जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असती तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचे निकटवर्तीय आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले प्रदीप कंद हे विजयी झाले आहेत. या निवडणूकीत प्रदीप कंद यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी रणनिती आखली होती. मात्र त्यांची रणनिती फसली गेली. प्रदीप कंद हे ११ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे प्रदीप कंद यांचा विजय पवारांसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number