‘मविआ सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक’ – चंद्रकांत पाटील

एसटीचे विलिनीकरण होईल असे डोक्यातून काढून टाका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ठणकावले. कोणत्याही सरकारच्या काळात एसटीचे विलिनीकरण शक्य नाही, असे ते म्हणाले. यावर आता विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटीचे विलिनीकरण का होणार नाही? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार गेंड्यांच्या कातडीपेक्षा भयानक असल्याचा टोलाही […]

‘मविआ सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक’ – चंद्रकांत पाटील

एसटीचे विलिनीकरण होईल असे डोक्यातून काढून टाका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ठणकावले. कोणत्याही सरकारच्या काळात एसटीचे विलिनीकरण शक्य नाही, असे ते म्हणाले. यावर आता विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटीचे विलिनीकरण का होणार नाही? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार गेंड्यांच्या कातडीपेक्षा भयानक असल्याचा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोई उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच एसटीचे विलिनीकरण का शक्य नाही, हे उपमुख्यत्र्यांनी कर्मचाऱ्यांना समजून सांगावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परखडपणाचा अभिमान आहे. परंतु त्यांनी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणाची मागणी डोक्यातून काढून टाका असे धुडकावल्यासारखे सांगू नये. तर एसटीचे विलिनीकरण का शक्य नाही हे त्यांनी कर्मचाऱ्यांना समजून सांगणे’, असे ते म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाष्य केले आहे. एसटीचे विलिनीकरण होईल हे कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावे, असे ते म्हणाले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी आम्ही चर्चा केली असून सकारात्मक भूमिकासुद्धा घेतली. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येईल असे, आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number